गोपाळराव झोडगे यांचे निधन 

gopalrao zodge
gopalrao zodge

नगर तालुका : भिंगार अर्बन बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव माधवराव झोडगे (78) यांचे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. गोपाळराव झोडगे हे भिंगार अर्बन बॅंकेचे गेल्या 40 वर्षांपासून अध्यक्ष होते. 

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालकपदावरही त्यांनी काम केले होते. जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केले. 1999 साली नगर शहर विधानसभा मतदार संघात त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय निकटचे संबंध होते. विखे घराण्याचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे एका मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे व भाजपचे नेते अभय आगरकर यांचे ते काका होत. 

शालेय जीवनात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. संघाच्या प्रत्येक कार्यात त्यांची मोठी मदत असायची. ते सीक्‍यूएव्हीमध्ये नोकरीस असतांना कर्मचारी संघटनेचे नेतृत्व केले. त्यातूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते काहीकाळ जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष होते. तसेच ते शिवसेनेत देखील होते. भिंगार माळी समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बरीच वर्ष कार्यभार संभाळला. नवरात्र उत्सव समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्यामुळेच तुळजाभवानी पालखी - पलंग भेट सोहळा नियोजित वेळेत होवू लागला होता. येथील सण उत्सवात ते नेहमी अग्रेसर असायचे. बैलगाडी व घोडागाडी शर्यती त्यांच्यामुळे अनेक वर्ष टिकून होती. 

नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचेच वर्चस्व आहे. याभागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न त्यांनी सोडविला. कापूरवाडी तलावाकडून येणाऱ्या ओढ्यावर बांधघालून शेतकऱ्यांना पाणी पुरवले. भिंगारमध्ये त्यांना मानाचे स्थान होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com