
Pathardi murder shocker: Grandson kills grandmother following money dispute; police at the crime scene.
sakal
पाथर्डी: तालुक्यातील मिरी येथे वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून, जागेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वाटपावरून वाद झाल्याने नातवानेच ७५ वर्षीय आजीचा खून करून तिचा मृतदेह जाळल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पाथर्डी पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी सचिन सुरेश मैंदड (रा. वडगाव गुप्ता) यास अटक केली असून, न्यायालयाने त्याला १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.