अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ नगर दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

कोरोनामुळे मृत ग्रामसेवकांच्या कुटुंबीयांना मुश्रीफ यांच्या हस्ते 50 लाख रुपयांचे धनादेश प्रदान करणार आहेत.

अहमदनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी (ता. 3) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कोरोनामुळे मृत ग्रामसेवकांच्या कुटुंबीयांना मुश्रीफ यांच्या हस्ते 50 लाख रुपयांचे धनादेश प्रदान करणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईचा आढावा घेणार आहेत. 

शिर्डी विमानतळावर गुरुवारी (ता. 3) सकाळी पावणेदहा वाजता मुश्रीफ यांचे आगमन होईल. साईदर्शनानंतर ते नगरला येतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 50 लाख रुपयांचा धनादेशवाटप कार्यक्रम होईल. नंतर आढावा बैठक व दुपारी 12 वाजता नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचा आढावा बैठक होईल. दुपारी अडीच वाजता ते शिर्डी विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी पावणेचार वाजता खासगी विमानाने ते कोल्हापूरला रवाना होतील.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Hassan Mushrif on a city tour on Thursday