पुन्हा एक घटना...चुलत्याला कुऱ्हाडीने घाव घालून केले ठार

sangamner crime
sangamner crime

संगमनेर ः शेताच्या बांधाच्या वादातून संतप्त झालेल्या पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे रविवार ( ता. 10 ) रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सतिश छबू यादव ( वय 36 ) असे मयताचे नाव आहे. यातील प्रमुख आरोपी गोरख संपत यादव, रा. कौठे कमळेश्वर याला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे छबू माधव यादव यांची गावात 75 गुंठे जागा आहे. त्यांच्या शेजारीच त्यांचा भाऊ संपत माधव यादव यांची जमीन आहे. त्यांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्या आहेत. मात्र, शेतीच्या बांधामुळे वाद होता.

या बाबत त्यांच्यात आठ दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादावर पोलिस ठाण्यात तोडगा निघाला होता. दरम्यान, गोरख यादव याने चुलत्यास कुर्‍हाडीने घाव घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. रविवारी दुपारी चुलत्यास घरातून बाहेर बोलावून केलेल्या मारहाणीत डोक्यात कुऱ्हाडीचे घाव बसल्याने सतीश गंभीर जखमी झाला होता. त्याला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्णीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत, पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गोरख यादव याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सहायक पोलिस निरीक्षक पप्पू कादरी पुढील तपास करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com