अहमदनगर महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

आरोग्य समितीची बैठक; शहरात निर्बंध लादणार
 निर्बंध
निर्बंधEsakal

अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना विषयक कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्व कार्यालयात कोरोना लस घेतल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, याबाबत कडक निर्बंध लादण्याची मागणी करण्यात आली आहे.

 निर्बंध
अहमदनगर : इथेनॉलनिर्मितीची परवानगी द्या; सदाशिव लोखंडे

महापालिकेचा आरोग्य विभाग व आरोग्य समितीची उपाययोजनांसाठी बैठकी आज झाली. कोरोनावर मात करायची असेल, तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही. महापालिकेच्या वतीने लसीकरणाची मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे. लस न घेणाऱ्यांवर कारवाई करावी करून कार्यालयात प्रवेश बंदी करावी, शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ न देता कडक निर्बंध लावावे, अशी मागणी आरोग्य समितीच्यावतीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात येणार आहे. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, संजय ढोणे, सतीश शिंदे, सचिन जाधव, निखिल वारे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, शशिकांत नजान व आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते.

 निर्बंध
अहमदनगर : बारागावचे गोड पाणी, पाणीपट्टी भरायची कोणी?

बैठकित सुचविल्या उपाययोजना

  1. लसीकरण वाढविण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करावी

  2. रुग्ण संख्या वाढत असलेल्या भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करावा

  3. पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेमध्ये जाऊन करावे

  4. मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी

  5. नागरिकांनी कोरोनाचे नियम पळून सहकार्य करावे

 निर्बंध
अहमदनगर : घर कागदावरच; प्रतिसादाअभावी योजनाच उघड्यावर

अशा आहेत सुविधा

  1. मनपाचे अडीचशे बेडचे कोविड सेंटर हॉटेल नटराज येथे तयार

  2. अतिदक्ष रुग्णांसाठी विळद घाटातील विखे हॉस्पिटल येथे सुविधा

  3. संबंधित रुग्णाचे बिल मनपा या देणार

  4. औषध व इतर खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागणार

  5. मनपाकडे ३० हजार रेमडीसिव्हीरचा साठा उपलब्ध़

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com