
“Heavy rains flatten sugarcane fields in Khadkewake; helpless farmers watch their dreams shatter.”
Sakal
-सतीश वैजापूरकर
शिर्डी: जेथे उन्हाळ्यात गवताची काडी नजरेस पडत नव्हती. टँकरचे पाणी प्यावे लागायचे. त्या खडकेवाके गावात निळवंडे धरणाचे पाणी आले. कोरडवाहू शेतकरी ऊस बागायतदार झाले. त्याला निसर्गाची दृष्ट लागली. कालच्या अतिवृष्टीने या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. पावसासोबत वादळी वाऱ्याने केवळ उसाचे फड नव्हे, तर या ऊस बागायदार होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे नशीब भुईसपाट झाले. काल परवापर्यंत डौलाने डोलणारे उसाचे मळे आता जमिनीवर लोळण घेत आहेत. शेतकरी हतबल झाला आहे.