पाथर्डीच्या या वारकऱ्याला पांडुरंग पावला...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

तालुक्‍यातील चिंचपूर पांगूळ येथील संत वामनभाऊ महाराजांचे निस्सीम भक्त व पंढरीचे वारकरी विठ्ठल ज्ञानोबा बडे (वय 76) यांना यावर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा करण्याचा वारकऱ्याचा मान मिळाला आहे. 

पाथर्डी : कोणत्याही वाऱ्याचे विठ्ठलचरण हेच ईप्सित असते. त्याच भावनेतून तो वारी करतो. पांडुरंगाच्या चरणावर डोके टेकवलं की त्याचा पायी चालत अालेला शिनभाग हलका होतो. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी जर पांडुरंगाचे दर्शन झाले तर उभ्या आयुष्याचे सार्थक झाले अशी वारकऱ्याची धारणा असते.

पाथर्डी तालुक्यातील एका वारकऱ्याला पांडुरंग पावला आहे. ते चिंचपूर पांगूळ येथील संत वामनभाऊ महाराजांचे निस्सीम भक्त व पंढरीचे वारकरी आहेत. विठ्ठल ज्ञानोबा बडे (वय 76) असे त्यांचे नाव आहे.  

आवश्‍य वाचा नगरमधील ओढ्या, नाल्यांचा श्‍वास गुदमरला 

श्रद्धा असली की फळ न मागताही मिळतेच, ही बडे यांची श्रद्धा फळाला आली. विठ्ठल ज्ञानोबा बडे हे संत वामनभाऊ महाराजांच्या प्रेमातील वारकरी. बाबांच्या दिंडीत अनेक वर्षांपासून ते पंढरपूरची वारी करीत होते. गेल्या दोन वर्षांपासून ते पंढरपूर येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या मठामध्ये वास्तव्याला होते. दिवसभर पांडुरंगाच्या मंदिरात वीणा वाजवायचे काम ते निष्काम भावनेने करीत होते आणि रात्री मठामध्ये जाऊन राहत होते.

या वर्षीचा पांडुरंगाच्या पूजेचा मुख्यमंत्र्यासोबतचा वारकऱ्याचा मान विठ्ठल बडे यांना मिळाला आहे. चिंचपूर पांगूळ गावामध्ये ही माहिती समजली आणि ग्रामस्थांनाही आनंदाचे भरते आले.

आवश्‍य वाचा पोलिस वसाहत व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पाणी 

ज्ञानोबा बडे हे वारकरी असून त्यांची संत वामनभाऊ यांच्यावर खूप श्रद्धा आहे. पंढरपूरचे ते नित्याचे वारकरी आहेत. संसार चांगला करून ते आता विठ्ठल चरणी समर्पित भावनेतून सेवा देत आहेत. त्याचे फळ विठ्ठलाने त्यांना मान देऊन दिले.

- धनंजय बडे,

सरपंच, चिंचपूर पांगूळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthal Bade got the honor of Pandurang Puja along with the Chief Minister