esakal | भाजपच्या नुतन कार्यकारिणी निवडीत माझी एकट्याची भुमिका नाही
sakal

बोलून बातमी शोधा

I am not alone in electing the new BJP executive

भाजपच्या नुतन कार्यकारिणी निवडीत माझी एकट्याची भुमिका नसुन पक्षाने प्रदेशस्तरावरून निवडी केल्या आहेत.

भाजपच्या नुतन कार्यकारिणी निवडीत माझी एकट्याची भुमिका नाही

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : भाजपच्या नुतन कार्यकारिणी निवडीत माझी एकट्याची भुमिका नसुन पक्षाने प्रदेशस्तरावरून निवडी केल्या आहेत. पक्षातील प्रामाणिक लोकांना नुतन कार्यकारिणीत स्थान दिले. असल्याचे भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले. 

पक्ष संघटनेत आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतू लवकरच मतभेद दुर होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपाने महिनाभरापुर्वी शहराध्यक्षपदी मारुती बिंगले, तालुकाध्यक्षपदी बबन मुठे यांच्या निवडी केल्या. नुतन कार्यकारिणी जाहीर झाल्याने भाजपामध्ये दुफळी निर्माण झाली. नुतन निवडीचा निषेध करुन मतदारसंघातील 213 बूथ प्रमुखांसह 44 शक्ती केंद्र प्रमुखांनी राजीनामे देवुन भाजपा श्रीरामपूर संचलन समितीची स्थापना केली. 

भाजपाचे कार्यकर्ते अभिजित कुलकर्णी आणि नगरसेवक किरण लुणिया यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष गोंदकर यांचे नेतृत्व संघटन विरोधी असल्याता आरोप केला होता. परिणामी, श्रीरामपुर भाजपामध्ये मोठी दुफळी निर्माण झाली आहे. भाजपा श्रीरामपूर संचलन समितीच्या तालुकाध्यक्षपदी प्रणव भारत तर शहराध्यक्षपदी संजय यादव यांची निवड केली आहे. त्यामुळे भाजपाच्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षातील सर्व पदाधिकारयांचे गैरसमज लवकरच दूर करणार असल्याचे गोंदकर यांनी सांगितले. नुतन कार्यकारिणीमध्ये निवडले पदाधिकारी हे संघटनेतील आहेत. कोणीही बाहेरचा कार्यकर्ता नाही. निवडीचे अधिकार एका व्यक्तीला नसतात. सामुहिकपणे निवड प्रक्रिया राबविली. त्यामुळे केलेले आरोप बिनबुडाचे आहे. सदर प्रकाराची कल्पना भाजपच्या प्रदेशस्तरावर दिली. वरिष्ठांनी बुथ प्रमुखांना दिलेल्या राजीनाम्याची माहिती देणार असल्याचे गोंदकर यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top