esakal | सावधान...ही कोरोना चाचणी कराल तर जीव गमावून बसाल, इथे चाललाय गोरखधंदा
sakal

बोलून बातमी शोधा

Beware ... if you test this corona, you will lose your life

कोरोनाच्या काळात रुग्णांच्या मनातील भीती व मानसिकतेचा गैरफायदा घेत काही खासगी प्रयोगशाळा आजाराच्या निदानासाठी बेकायदेशिर पध्दतीने या चाचणीचा उपयोग करीत असल्याची बाब समोर आली आहे.

सावधान...ही कोरोना चाचणी कराल तर जीव गमावून बसाल, इथे चाललाय गोरखधंदा

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः कोविड -19 चा संसर्ग झाला की नाही याचे निदान करण्यासाठी संक्रमीत व्यक्तीची रक्ताच्या नमुन्यातून सातव्या दिवसानंतर करण्यात येणारी रॅपिड अँटीबॉडी चाचणी संगमनेर व अकोले तालुक्यातील काही वैद्यकिय व्यवसायीक व खासगी प्रयोगशाळा चालक, कोवीडच्या निदानासाठी बेकायदेशिररित्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

संशयीत रुग्णाला कोवीडचा संसर्ग झाली की नाही हे ठरवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यातून केल्या जाणाऱ्या रॅपिड अँटीबॉडी टेस्ट कोविड निदानासाठी वापरण्यात येत आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ( आयसीएमआर ) यांनी या संसर्गाचा शोध घेण्यासाठी घसा किंवा नाकातील स्वॅबद्वारे करण्यात येणारी आरटीसीपीआर ही चाचणी सर्वोत्तम आहे. 

हेही वाचा - मंत्री शंकरराव गडाखांचा साधेपणा बीडकरांना भावला

जलद निदानासाठी रॅपीड अँटीजेन टेस्ट ही चाचणी सुचवली आहे. अँटीबॉडी चाचणीचा वापर कोरोनाच्या निदानासाठी करता येत नाही. कारण या आजाराची लक्षणे सुरू झाल्याच्या सातव्या दिवसानंतर रक्ताद्वारे होणाऱ्या या चाचणीचा उपयोग रोगाच्या सुरवातीच्या काळात होत नाही.

ही चाचणी केवळ भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेची मान्यता असलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून, परिषदेच्या पोर्टलवर नोंदणी करून केवळ सर्वेक्षणाच्या उद्देशासाठी करता येते. मात्र कोरोनाच्या काळात रुग्णांच्या मनातील भीती व मानसिकतेचा गैरफायदा घेत काही खासगी प्रयोगशाळा आजाराच्या निदानासाठी बेकायदेशिर पध्दतीने या चाचणीचा उपयोग करीत असल्याची बाब समोर आली आहे.

यामुळे चुकीचा अहवाल प्राप्त होवून, रुग्णास लक्षणे निर्माण झाल्यानंतर प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार मिळणार नाहीत. अशी व्यक्ती अत्यवस्थ झाल्यानंतर उपचाराअभावी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या संदर्भातील ताप, सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास होणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे व सल्ला दिल्यास, आरटीपीसीआर ही अधिकृत चाचणी करून योग्य निदान करून उपचार प्राप्त करून घ्यावे.

कोणी वैद्यकीय व्यावसायिक अथवा खाजगी प्रयोगशाळा चालक रक्ताद्वारे होणाऱ्या या चाचणी विषयी सांगत असेल तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

संपादन - अशोक निंबाळकर