पीक कर्ज घ्यायचंय...मोबाईलवरही करता येईल अर्ज

If you want to take crop loan ... you can also apply on mobile
If you want to take crop loan ... you can also apply on mobile
Updated on

नगर ः खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याची पेरणीपूर्व मशागत सुरू होती. त्याच काळात तो पावसाचा अंदाज पाहून पेरणीची तयारी करतो. बी विकत घेण्यासाठी हातउसने पैसे घेतले जातात. किंवा बँक किंवा सावकाराचे उंबरे झिजवले जातात. बँकेचा अधिकारी आहे तर तलाठी गायब असतो, दोघेही जागेवर सापडले तर कागदपत्र सापडत नाहीत किंवा अन्य कारणाने शेतकर्याची धांदल उडालेली असते. त्याच मुलांच्या शाळेची अॅडमिशन सुरू होतात. त्यामुळे शेतकरी पुरता वैतागून गेलेला असतो.

आता तर कर्जासाठी बाहेर पडावं तर कोरोनाची भीती. घरच्या घरी पीक कर्ज मिळवता आलं तर, अशी स्वप्न अनेकजण पाहत होते. परंतु ते स्वप्न नगरच्या जिल्हाधिकाऱ्यामुळे सत्यात उतरणार आहे.

जून- कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या खरीप हंगामात पीक कर्ज  वेळेवर मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अर्थात एनआयसीने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून्ही अर्ज करता येणार आहे.

पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करताना मोबाईलवर https://ahmednagar.nic.in/notice/application-for-crop-loan-2020-21-ahmednagar-district/ लिंकवर जाऊन शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करू शकतात. कोरोना संकटाच्या काळात दैनंदिन व्यवहारावर तसेच मनुष्यबळ कमतरतेमुळे बँकांच्या कामकाजावरही परिणाम झाला. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाले तर त्यांना या हंगामासाठी त्याचा योग्य उपयोग करता येईल.

हे जाणून जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी एनआयसीला अशा प्रकारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यास सांगितले होते. त्यानुसार, अर्जासाठी आवश्यक माहिती या लिंकमध्ये भरून शेतकरी देऊ शकतात. त्यानंतर त्या अर्जावर बँक निर्णय घेणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार अाहे. 

कोरोना संकटाच्या काळात बँकेसमोर रांगा लावण्याचीही गरज राहणार नाही. सर्व शेतकरी बांधवांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक संदीप वालावलकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com