संगमनेरमध्ये चालायची बेकायदा कोविड तपासणी

Illegal covid investigation in Sangamner
Illegal covid investigation in Sangamner

संगमनेर ः नियमबाह्य कोविड तपासणी करणाऱ्या नाशिक येथील खासगी प्रयोगशाळेला संगमनेरच्या प्रशासनाने नोटीस बजावली. संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे.

नाशिकमधील गणदीप डायग्नोस्टिक्‍स या खासगी प्रयोगशाळेतील कर्मचारी संगमनेरात येऊन रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेत. शहरातील खासगी बॅंकेतील सात कर्मचाऱ्यांसह, इतर दोघांचे स्त्राव त्यांनी चाचणीसाठी घेतले होते. त्यात पॉझिटिव्ह आलेल्या सात जणांना हॉटेल व राहत्या घरातच विलगीकरण केले होते. या प्रकारात येथील काही जणांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे.

शासन नियमाप्रमाणे चाचणीसाठी स्त्राव घेतलेल्या कोविड संशयित रुग्णाचे नाव, गाव, पूर्ण पत्ता "आयसीएमआर'च्या संकेतस्थळावर भरणे बंधनकारक आहे. मात्र, रुग्णाचा शोध लागणार नाही, अशा पद्धतीने त्यावर अर्धवट माहिती भरल्याचे उघड झाले. 

नाशिक महापालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तेथील पाच प्रयोगशाळांवर कोरोनाचाचणी करण्यास बंदी घातली आहे. त्यात गणदीप डायग्नोस्टिक्‍स या प्रयोगशाळेचाही समावेश आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार निकम यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली. खासगी प्रयोगशाळेच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. 

डॉ. घोलप म्हणाले, की या गैरप्रकाराबाबत संबंधित खासगी प्रयोगशाळेला आज आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटीस बजावली आहे. आगामी दोन दिवसांत त्यांचे म्हणणे ऐकून त्यानुसार कायदेशीर कारवाई करणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com