esakal | उद्या बाप्पा जाणार गावाला, नगरमध्ये मूर्ती संकलनासाठी रथ
sakal

बोलून बातमी शोधा

Immersion of Ganesha tomorrow

महापालिका प्रशासन, तसेच जिल्ह्यातील पालिका व नगरपंचायतींसह ग्रामपंचायतींनी घरगुती गणेशमूर्ती संकलन करून विसर्जन करण्यासाठी गणेशरथ तयार केले आहेत. या रथातून गणेशमूर्ती संकलीत करून त्यांचे जलकुंभांत विसर्जन केले जाणार आहे. 

उद्या बाप्पा जाणार गावाला, नगरमध्ये मूर्ती संकलनासाठी रथ

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर ः शहरासह जिल्ह्यात 1057 गणेशमंडळांनी "श्रीं'ची प्रतिष्ठापना केली आहे. या सर्व मंडळांना जागेवरच सोशल डिस्टन्स पाळून गणेशविसर्जन करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. शहरासह जिल्ह्यात उद्या (ता.1) मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त दिला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील 10 दिवस मंडळांनी सोशल डिन्स्टन्स पाळून विविध धार्मिक कार्यक्रम केले. दरवर्षीप्रमाणे यंदा बाहेरील जिल्ह्यातून कमी प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त मागविला आहे. राखीव दलाच्या तुकड्या जिल्ह्यात आल्या असून, पोलिस उपअधीक्षकांच्या नियोजनाखाली त्या तालुक्‍यांत बंदोबस्त देणार आहेत. 
ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरातील मानाच्या गणपतीची उद्या (मंगळवारी) सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते आरती होईल. त्यानंतर लगेच जागेवरच गणेशविसर्जन होणार आहे. 

नगर शहरात असा बंदोबस्त 
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, आठ पोलिस निरीक्षक, 20 सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, 350 पोलिस कर्मचारी, राखीव दलाच्या तीन तुकड्या, आरसीएफच्या तीन तुकड्यांचा बंदोबस्त आहे. ड्रॉन कॅमेऱ्याद्वारे शहरातील "श्रीं'च्या विसर्जन प्रक्रियेवर पोलिस प्रशासनानी नजर असेल. 

हेही वाचा - चहाचा शेवटचा घोट घेत असतानाच

गणेशमूर्ती संकलन करणार 
महापालिका प्रशासन, तसेच जिल्ह्यातील पालिका व नगरपंचायतींसह ग्रामपंचायतींनी घरगुती गणेशमूर्ती संकलन करून विसर्जन करण्यासाठी गणेशरथ तयार केले आहेत. या रथातून गणेशमूर्ती संकलीत करून त्यांचे जलकुंभांत विसर्जन केले जाणार आहे. 

जलकुंड परिसरात आरतीला मनाई 
शहरात ठिकठिकाणी जलकुंड उभारले असून, तेथे गणेशविसर्जनास परवानगी दिली आहे. मात्र, तेथे आरती करता येणार नाही. त्यामुळे घरीच गणेशआरती करून जलकुंडावर विसर्जन करावे लागेल. 


पोलिस ठाणेनिहाय गणेशमंडळे 
कोतवाली ः 91, तोफखाना 40, नगर तालुका 46, सुपे ः 37, अकोले ः 38, कोपरगाव ः सहा, राहुरी ः नऊ, श्रीरामपूर ः 31, पारनेर एमआयडीसी ः 15, पारनेर ः 40, कर्जत 46, श्रीगोंदे ः 18, बेलवंडी ः 48, शेवगाव ः 101, पाथर्डी ः 50, नेवासे ः 93, संगमनेर ः 76, कोपरगाव शहर ः सहा. 

नगरमधील कृत्रिम हौद 
शहरासह उपनगरांत एकूण 21 ठिकाणी कृत्रिम हौद तयार केले आहेत. ते असे- भारत बेकरी चौक (बोल्हेगाव), मयूर कॉर्नर चौक (वडगाव गुप्ता), नाना चौक (तपोवन रस्ता), साईबाबा मंदिर (निर्मलनगर), यशोदानगर विहिर (पाइपलाइन रस्ता), यशोदानगर (पाइपलाइन रस्ता), महालक्ष्मी उद्यान (बालिकाश्रम रस्ता), गंगा उद्यान (मिस्कीन मळा), बाळाजी बुवा विहिर (कल्याण रस्ता), नेप्ती नाका (कल्याण रस्ता), सारसनगर (पुलाशेजारील खुली जागा), साईनगर (बुरुडगाव), फिरोदिया हायस्कूल पटांगण (वाडिया पार्कसमोर), सावेडी जॉगिंग ट्रक (प्रोफेसर चौक), हनुमान मंदिर (गोविंदपुरा), लोखंडी पुलाशेजारी (स्टेशन रस्ता), क्रांती चौक (केडगाव, लिंक रस्ता), बुद्धविहार शेजारी (केडगाव), केडगाव देवी मंदिर (केडगाव), न्यू आर्टस महाविद्यालयासमोर, बारा इमाम ट्रस्ट (कोठला मैदान). 

loading image
go to top