राज्यात सर्वच मंदिरात ड्रेस कोड लागू करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील विविध मंदिर परिसरात भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्यासाठी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली.

श्रीरामपूर : राज्यातील सर्व मंदिर परिसरात भारतीय संस्कृती अनुरुप ड्रेसकोड नियमावली लागु करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने केली.

राज्य सरकारने नुकतीच सर्व शासकीय कार्यालयांसाठी ड्रेसकोड लागू केली. त्यानुसार सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स पॅंट, टी-शर्टसह भडक रंगाचे आणि नक्षीकाम असलेले कपडे तसेच स्लीपर वापरण्यावर बंदी आहे.

कामावर असताना केवळ शोभनीय कपडे घालण्याचे आवाहन केले आहे. हिंदू जनजागृती समितीने याचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वी शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानने भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा - नगरचे कलेक्टर राहतात महालात

या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील विविध मंदिर परिसरात भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्यासाठी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे या मागणीचे समितीतर्फे निवेदन पाठविल्याची माहिती समितीचे संघटक सुनील घनवट यांनी दिली. 
भारतीय संस्कृतीतील अनुरुप वस्त्रसंहिता लागू केल्याने मंदिरातील पावित्र्य आणि श्रद्धाभाव टिकून राहण्यास मदत होईल.

पारंपारिक वस्त्र निर्मिती उद्योगास चालना मिळणार असल्याने सरकारने राज्यातील सर्व मंदीर परिसरात ड्रेसकोड नियमावली लागु करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement dress code in all temples in the state