esakal | नगरमध्ये ‘वीकेंड’चा फज्जा! व्यवसायिकांचे मागच्या दाराने व्यवहार सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

नगरमध्ये ‘वीकेंड’चा फज्जा! व्यवसायिकांचे मागच्या दाराने व्यवहार सुरूच

हा ‘वीकेंड’ नेमका गोरगरिबांसाठीच लागू केला काय, असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे.

नगरमध्ये ‘वीकेंड’चा फज्जा! व्यवसायिकांचे मागच्या दाराने व्यवहार सुरूच

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात शनिवारी व रविवारी ‘वीकेंड’ (weekends) पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) करण्यात आले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे; मात्र शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रास व्यवहार सुरू होते. प्रशासनाकडून मात्र कोठेही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे हा ‘वीकेंड’ नेमका गोरगरिबांसाठीच लागू केला काय, असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि"र्बंद", कापडबाजारात शुकशुकाट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २८ जूनपासून नवे निर्बंध लागू केले. त्यानुसार शनिवारी व रविवारी कडक ‘वीकेंड’ पाळण्यात येत आहे. शनिवारी सकाळी दूध व भाजीपाल्याची विक्री करण्यात आली. इतर दुकाने बंद होती. कापड बाजार, नवी पेठ, अडते बाजार, डाळ मंडई परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. बाजारपेठेत वाहनेही तुरळक दिसत होती. मात्र, शहराच्या चितळे रस्ता, दिल्ली गेट, माळीवाडा भागातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसून येत होती. सर्व दुकाने बंद असतानाही नागरिक नेमके कशासाठी बाहेर पडत आहेत, याचे कोडे कोणालाच उलगडले नाही.

हेही वाचा: बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांवर

शहरातील काही दुकाने पुढून बंद ठेवून मागच्या दाराने ‘वीकेंड’च्या पहिल्या दिवशी सुरू होती. काही व्यावसायिकांनी पुढच्या बाजूने अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय केला. चितळे रस्त्यावर भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची दिवसभर गर्दी होती. याच भागात नाश्त्याच्या हातगाड्या दिवसभर सुरू होत्या. विशेष म्हणजे या हातगाड्यांवर नाश्त्यासाठी झुंबड उडत होती. त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘वीकेंड’चा शहरात पूर्णपणे फज्जा उडाला.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीच्या सोशल मीडियावर अश्‍लील व्हिडिओ; अहमदनगर जिल्ह्यातील युवकास अटक

वाहतुकीने चितळे, माळीवाडा रस्त्याचा श्‍वास कोंडला

‘वीकेंड’ असतानाही शनिवारी चितळे रस्ता व माळीवाडा वेस परिसरातील रस्त्यांवर गर्दी दिसून येत होती. या परिसरात दिवसभर अधूनमधून वाहतुकीची कोंडी होत होती. या परिसरात भाजीपाला व फळेविक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे ‘वीकेंड’चा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हस्य

प्रशासनाची कारवाई कागदावर

‘वीकेंड’मध्ये दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित होते; मात्र प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

loading image