‘जलजीवन’ योजनांना वाढीव निधी; रोहित पवार

रोहित पवारांच्या प्रयत्नांमुळे मंत्री पाटील यांचा निर्णय
Increased funding for jaljeevan schemes Rohit Pawar ahmednagar
Increased funding for jaljeevan schemes Rohit Pawar ahmednagarTeam esakal

जामखेड : पिण्याच्या पाण्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जत- जामखेडमधील सर्व योजनांसह राज्यातील या हेडअंतर्गत मंजूर झालेल्या योजनांच्या खर्चासाठी वाढीव निधी मिळणार आहे. याकरिता आमदार रोहित पवारांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत केलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. आता नवीन डीएसआर दरानुसार मंजूर झालेल्या सर्व योजनांना वाढीव निधी प्राप्त होणार आहे. जलजीवनअंतर्गत मंजूर झालेल्या योजना मार्गी लावण्याकरिता अडसर ठरणाऱ्या निधीच्या विषयावर आमदार रोहित पवारांनी तोडगा काढून या योजनेलाच नवसंजीवनी दिली.

आमदार रोहित पवारांनी जलजीवन मिशन या केंद्र शासनाच्या योजनेला गावोगावी पोचवून टँकरमुक्त गाव ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. दोन्ही तालुक्यांतील 216 गावांमध्ये टप्प्याटप्प्याने ही योजना राबविली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात तब्बल 70 योजना मंजूर होऊन; बहुतांश गावांतील योजनांचा प्रारंभ महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याच गावातील महिलांच्या उपस्थितीत, त्यांच्याच हस्ते नारळ वाढवून झाला. मात्र, या योजनांच्या खर्चासाठी पूर्वी करण्यात आलेली तरतूद आणि नव्याने सर्वेक्षण केल्यास नवीन डीएसआरच्या दरानुसार अधिकची रक्कम लागणार आहे, हे आमदार पवारांच्या लक्षात आले. त्यांनी या संदर्भात संबंधित विभागातील तज्ज्ञांशी चर्चा केली. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी बदलत्या डीएसआरनुसार मंजूर सर्व योजनांना वाढीव निधी तातडीने वर्ग करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. दोन्ही तालुक्यांतील उर्वरित योजनांनाही मंजुरी देऊन, आर्थिक तरतूद करीत जलजीवन मिशनला गती देण्याचे ठरले.

बदलते डीएसआरचे दर, स्टीलचे वाढलेले दर लक्षात घेऊन ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मंजूर योजनांना वाढीव निधी मिळविण्याकरिता प्रयत्न केले. योजनेत समाविष्ट नसलेल्या गावांसंदर्भात चर्चा करून लाभ देण्याचा प्रस्ताव मांडला. सोलरच्या समावेशाचा प्रस्तावही मांडला.

आमदाराने व्यक्त केले मंत्र्यांचे ऋणनिर्देश!

अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची योजना नाही म्हणून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवता आला नाही. पाण्यासाठी कोसो दूरची होणारी पायपीट थांबविण्यासाठी मिशन म्हणून हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यासाठी शासकीय स्तरावरून पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मदत केली. याकरिता आमदार पवारांनी बैठकीत त्यांचे आभार मानले.

जलजीवन मिशनअंतर्गत कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील योजना मंजूर झाल्या. डीएसआरचे दर बदलल्याने या योजनांसाठी लागणाऱ्या उर्वरित दरडोई खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळताच, दोन्ही तालुक्यांतील उर्वरित योजनांनाही लवकरच मंजुरी मिळेल.

- आमदार रोहित पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com