
सोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे आत्महत्या प्रकरणी आज तिसऱ्या दिवशी शनिशिंगणापूर पोलिसांनी कोणाचाही जबाब घेतला नाही. तपासाचा भाग म्हणून विश्वस्तांना चौकशी व जबाब घेण्यासाठी बोलाविण्यात आले होते; मात्र येथील पोलिस अधिकारी बैठकीसाठी अहिल्यानगरला गेल्याने पोलिस ठाण्याकडे दिवसभरात कुणीही फिरकले नसल्याचे समजते. उद्या शुक्रवारी (ता.१) मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या तारखेस याही वेळेस विश्वस्तांनी जाण्या ऐवजी देवस्थानच्या कायदेशीर सल्लागार वकिलांना पाठविले आहे.