पोस्टाच्या बचत खात्यात पाचशे रुपये शिल्लक अनिवार्य

  अमित आवारी
Friday, 27 November 2020

५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असलेल्या खातेदारांनी गैरसोय टाळण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंत खात्यात किमान ५०० रुपये शिल्लक राहतील याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर : पोस्टाच्या बचत खात्यात सध्या सर्वांत कमी रकमेची मर्यादा ५० रुपये आहे. मात्र, ११ डिसेंबरपासून बचत खात्यात किमान ५०० रुपये असणे आवश्‍यक करण्यात आले आहे. बचत खात्यावर ५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असलेल्यांनी ११ डिसेंबरपर्यंत रक्कम कमीत कमी ५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त राहील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जे. टी. भोसले यांनी केले आहे.

हे ही वाचा : कर्डिलेंचा इशारा; शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा न केल्यास आंदोलन

बचत खात्यातील रक्कम ११ डिसेंबरनंतर ५०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशा खात्यातून मेंटेनन्स चार्जेस म्हणून १०० रुपये व कर, एवढी रक्कम वजा केली जाईल. खात्यातील शिल्लक रक्कम १०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशी बचत खाती प्रणालीमधून आपोआप बंद होतील, याची खातेदारांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. ५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असलेल्या खातेदारांनी गैरसोय टाळण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंत खात्यात किमान ५०० रुपये शिल्लक राहतील याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is mandatory to keep a balance of five hundred rupees in a post savings account