

Jain community members during their peaceful march to the Ahilyanagar Collector’s Office; memorandum submitted to officials over Pune land dispute.
Sakal
अहिल्यानगर: पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडीपूर्वक धर्मादाय आयुक्तांना खोटी व चुकीची माहिती देऊन मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागेची चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने विक्री केली. हा जागा विक्रीचा व्यवहार रद्द करावा, या मागणीसाठी अहिल्यानगर येथील सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता.