जामखेडच्या मुख्याधिकारीपदी जळगावचे दंडवते, चोपन्न महिन्यात सतरा अधिकारी

जामखेडच्या मुख्याधिकारीपदी जळगावचे दंडवते, चोपन्न महिन्यात सतरा अधिकारी

जामखेड : जामखेड नगरपालिकेचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्याधिकारी सुहास जगताप यांची जामखेड येथून बदली झाली अाहे. त्यांच्या जागी जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते हे रुजू होणार आहेत. या निमित्ताने जामखेड नगरपालिकेला चोपन्न (54) महिन्यात सतरा (17) वे मुख्याधिकारी मिळाले आहेत. 

या संदर्भात अधिक माहिती अशी; जामखेड नगरपालिकेच्या स्थापनेला 60 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला अाहे. या काळात आत्तापर्यंत 16  मुख्याधिकारी  या नगरपालिकेने पाहिले आहेत. दंडवते यांच्या निमित्ताने आता सतरावे मुख्याधिकारी बुधवारी (ता: 8) रोजी जामखेड नगरपालिकेला हजर होत आहेत.

जामखेड नगरपालिकेच्या स्थापनेपासून मुख्याधिकारीची खुर्ची  कायम हालती राहिली. सुरुवातीला पहिल्या पस्तीस महिन्यांमध्ये नगरपालिकेने पंधरा मुख्याधिकारी पाहिले. सुहास जगताप यांच्या निमित्ताने सोळावे मुख्याधिकारी ऐकोणीस महिन्यापूर्वी हजर झाले.

जगताप हे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्याधिकारी ठरले. त्यांच्या काळात  दोन  नगराध्यक्ष झाले. यामध्ये हे सर्वाधिक काळ विद्यमान नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा राहिला.


जगताप यांच्या कार्यकाळात जामखेड  नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लहान-मोठे अनेक विकासाची कामे झाली. मात्र, यामध्ये सर्वाधिक लक्षणीय ठरलेलं काम तपनेश्वर रस्ता होय. जामखेडकरांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून उजनी  बॅक वॉटरमधून करण्यात येणारी  114 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना त्यांच्याच काळात मंजूर झाली आहे.

आता  ही योजना पूर्ण करण्याची जबाबदारी  नव्याने  रुजू होत असलेल्या मुख्याधिकारी दंडवते यांच्यावर येऊन पडली आहे. तसेच सर्वाधिक काळ जामखेड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करणारे मुख्याधिकारी जगताप यांच्या सर्वाधिक कार्यकाळ राहण्याचे रेकाँर्ड ब्रेक करतात का हे पहावे लागेल.

दंडवते यांच्या निमित्ताने  जामखेड नगरपालिकेच्या प्रशासनात  झालेला बदल  सत्तांतरा नंतर महत्वाचा समजला जातो.  विद्यमान नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी  नुकतेच  माजी मंत्री राम शिंदे यांचे नेतृत्व सोडून आमदार रोहित पवार  यांचे नेतृत्व स्वीकारले आहे नेतृत्व बदलानंतर  मुख्याधिकारी ची झालेली बदली चर्चेचा विषय ठरलेली आहे.
अवघ्या  पाच महिन्यावर  विद्यमान नगरपालिकेच्या नगरसेवकांचा  व पदाधिकाऱ्यांचा कालावधी राहिलेला असताना  झालेला हा बदल  जामखेड करांसाठी  कितपत  हितवाह ठेवतो  हे येणारा काळच सांगेल.

दरम्यान  सुहास जगताप यांना अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जामखेड नगरपालिका येथून कार्यमुक्त केले अाहे.  बुधवार ता. 8 रोजी  मिनीनाथ दंडवते हे  जामखेड नगरपालिकेचे सतरावे मुख्याधिकारी म्हणून  पदभार स्वीकारणार आहेत  जगताप यांना  या ठिकाणावरून कार्यमुक्त केले असले तरी  अध्याप  नवीन नगरपालिका मिळालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com