जामखेड : हल्लेखोर एसटी कर्मचारी नाहीत;जयंत पाटील

जयंत पाटील; शरद पवार यांच्या घरावरील हल्ला जाणीवपूर्वक
Jayant Patil
Jayant PatilSakal

जामखेड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मागील चाळीस वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मदत करून आधार देण्याचे काम केले. खरा एसटी कर्मचारी कधीही त्यांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही. त्यामुळे हे हल्ला करणारे नेमके कोण होते, हे तपासाअंती पुढे येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या परिसंवाद मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजप व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, की एसटी महामंडळ विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यावेळी काहींनी भाषणे केली. माथी भडकविण्याचे काम त्यांनी केले असेल, तर ते तपासले पाहिजे. पवार यांच्या घरावर हल्ला करणारे खरोखर एसटीचे कर्मचारी नसावेत, असे मला वाटते. शरद पवार यांनी मागील ४० वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मदत करून आधार देण्याचे काम केले. खरे एसटी कर्मचारी कधीही त्यांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने पोचणार नाहीत.

शरद पवार यांनी मध्यस्थी करून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी मदत केली. त्यामुळे या हल्ल्यात एसटी कर्मचारी नसावेत. हे मुद्दाम व जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. पवार यांच्या घरी गेलेले एसटी कर्मचारी होते का, प्रसारमाध्यमांनी मागण्या विचारल्या, तर त्यांना धड त्या सांगताही येत नव्हत्या. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल, असेही पाटील म्हणाले.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मोफत वकिली केली नाही. आजपर्यंत अनेक आंदोलने झाली, मात्र नेत्यांच्या घरावर हल्ला करणारे आंदोलन महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.

- रोहित पवार, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com