esakal | जायकवाडीचा फैसला परतीच्या पावसाच्या हाती! यंदा पाणीवाटपावरून प्रादेशिक वाद टळणार?
sakal

बोलून बातमी शोधा

jayakwadi

जायकवाडीचा फैसला परतीच्या पावसाच्या हाती! जाणकारांचा दावा

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि.अहमदनगर) : वरच्या बाजूच्या धरणांतून जायकवाडीत (jayakwadi dam) पाणी सोडावे लागेल की नाही आणि त्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर- नाशिक असा संघर्ष पुन्हा पेटेल की नाही, याचा फैसला आता ‘रिटर्न मॉन्सून’च्या (return monsoon) हाती आहे. आजवरचा अनुभव लक्षात घेता, ‘रिटर्न मॉन्सून’ सहसा दगा देत नाही. त्यामुळे जायकवाडीतील दहा टीएमसी पाण्याची तूट पुढील दीड महिन्यात भरून निघेल. पाणीवाटपासाठी दोन क्रमांकांचा मेंढेगिरी फॉर्म्युला वापरावा लागेल. त्यात निळवंडेतील पाणीसाठा महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे यंदा पाण्यावरून प्रादेशिक वाद होण्याची सुतराम शक्यता नाही, असा जाणकारांचा दावा आहे.

यंदा पाणीवाटपावरून प्रादेशिक वाद टळतील : जाणकारांचा दावा

मेंढेगिरी फॉर्म्युल्याच्या दुसऱ्या सूत्रानुसार, वरच्या बाजूच्या धरणांतून फार तर पाच टीएमसी पाणी जायकवाडीत सोडावे लागेल. एकटे निळवंडे धरण ही गरज पूर्ण करेल. त्यामुळे पाऊस कमी असला तरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून नगर- नाशिक विरुद्ध मराठवाडा, असा संघर्ष यंदा होणार नाही. पाणीवाटपाच्या दुसऱ्या पर्यायाचा विचार केला, तर धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे असायला हवी. कंसातील टक्केवारी सध्याच्या पाणीसाठ्याची आहे. जायकवाडी 54 (43), मुळा 65 (67), भंडारदरा समूह 78 (78), गंगापूर समूह 74 (82), दारणा 84 (79) याचा अर्थ असा, की मुळा, भंडारदरा व गंगापूर समूहातून जेमतेम पाणी तिकडे देता येईल. म्हणजेच मेंढेगिरी समितीच्या दुसऱ्या सूत्रानुसार, वरच्या बाजूच्या धरणांतून अंशतः पाणी सोडावे लागेल. ते पाच टीएमसीहून अधिक नसेल. निळवंडे धरणात सुदैवाने तेवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. तथापि, जायकवाडी धरणातून होणाऱ्या बेसुमार पाणीउपशाला लगाम लावायला हवा. किमान त्याची नोंद ठेवून, पाणीवाटपाची वेळ आली तर अतिरिक्त उपशाचे पाणी त्यातून वजा केले जावे, अशी नगर व नाशिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा: मोबाईलवर मेसेज पाठवून तलाक; पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा

‘मेंढेगिरी’चे सूत्र वापरावे लागेल

पाणीवाटपासाठी मेंढेगिरी समितीचे दुसऱ्या क्रमांकाचे सूत्र वापरावे लागेल. ‘रिटर्न मॉन्सून’ जायकवाडीतील दहा टीएमसी पाणीतूट कमी करेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आंध्रच्या किनारपट्टीकडून येणाऱ्या वादळाच्या तीव्रतेनुसार परतीच्या पावसाचा जोर ठरतो. वादळाचा वेग चांगला राहिला, तर परतीचा पाऊस थेट वरच्या बाजूच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रापर्यंत जाऊ शकतो. तथापि, सध्याची स्थिती लक्षात घेता, वरच्या बाजूच्या निळवंडेसारख्या प्रकल्पातून अंशतः फार तर पाच टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडावे लागेल. त्यामुळे वादाची शक्यता वाटत नाही. यंदा धरणक्षेत्रात सरासरीच्या 25 टक्के व लाभक्षेत्रात 30 टक्के पाऊस कमी झाला आहे. - उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

हेही वाचा: प्रवरेच्या अधिकाऱ्यास काळे फासल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा

loading image
go to top