esakal | पक्षांतर्गत गटबाजीवरून जयंत पाटलांच्या नेत्यांना कानपिचक्या! अनेकांची घेतली फिरकी
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

पक्षांतर्गत गटबाजीवरून जयंत पाटलांच्या नेत्यांना कानपिचक्या!

sakal_logo
By
संजय काटे


श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (Jayant Patil) यांनी बुधवारी रात्री उशिरा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. श्रीगोंद्यातील नेत्यांमधील गटबाजीवरुन कानपिचक्या देतानाच पदाधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेतली. विशेष म्हणजे बैठकीला केवळ राष्ट्रवादीच्या ठराविक पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण असतानाही काँग्रेस (Congress) व शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकाऱ्यांची हजेरी चर्चेचा विषय ठरली.

ही बैठक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांपुरतीच होती. माध्यम प्रतिनिधीनींनाही बैठकीत हजर राहू देवू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तथापि बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक थेट व्यासपिठावर विराजमान होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत बैठकीचा वृत्तांत बाहेर पाठविण्याची चोख व्यवस्था केली होती.

हेही वाचा: Jayant Patil : ‘सीना’चे फेरसर्वेक्षण करणार

नेत्यांमधील गटबाजी पक्षाला अडचणीत आणणारी

पाटील यांनी बैठकीत प्रदेश कार्यालयाला श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी पक्षाविषयी आलेला एक अभिप्राय वाचून दाखविला. त्यात जगताप व शेलार या दोन नेत्यांमध्ये गटबाजी सुरु असल्याने त्याचा फटका कार्यकर्ते व पक्षाला बसत असल्याचा आशय होता. येथे पक्षवाढीला पोषक वातावरण असले तरी या नेत्यांमधील गटबाजी अडचणीची ठरु शकते. पाटील यांनी यांनी हा अभिप्राय वाचून दाखवित श्रीगोंद्यात नेत्यांमध्ये अलबेल नसल्याचे सूचित करतानाच एकत्र काम करा असा अप्रत्यक्ष सल्ला नेत्यांना दिला.

पाटील यांनी घेतली अनेकांची फिरकी

बैठकीला उपस्थितीत असणाऱ्या विविध अध्यक्षांची फिरकीही पाटील यांनी घेतली. कुणाची किती जणांची कार्यकारणी आहे आणि किती सदस्य बैठकीला आहेत असे विचारताच अनेकांची तोतरी वळाली. एका अध्यक्षांने तर कार्यकारणीतील बहुतेक सदस्यांना कोरोना झाल्याचे कारण दिल्यावर आपण त्यातून कसे सुटलात असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला. पक्ष मजबूत होईल सगळ्यांनी लक्ष देवून कामाला लागा असा संदेश देत पाटील यांनी तालुक्यावर त्यांचे बारीक लक्ष असल्याचे सूचित केले.

हेही वाचा: Ahmednagar : ‘स्थानिक’मध्ये आघाडी - जयंत पाटील

मंत्र्यांच्या साक्षीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पाणउतारा

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष मीनल भिंताडे यांचे पती मोहन भिंताडे यांनी घनशाम शेलार यांचे भाषण थांबवत पालिकेच्या कारभारावर जोरदार मुद्दा मांडला. बड्यांची अतिक्रमणे जागीच ठेवून सामान्यांच्या मालकीच्या जागेतून पालिका रस्ता करताना दादागिरी करते. व्यासपिठावर जे काँग्रेस पदाधिकारी बसले आहेत ते भाजपातून आलेले आहेत. यांना वेळीच ओळखा असे ओरडून सांगत भिंताडे यांनी नगरसेवकांची केलेली थेट तक्रार चर्चेत आली आहे.

मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अंकुश काकडे, रुपाली चाकणकर, माजी आमदार राहूल जगताप, घनशाम शेलार, हरिदास शिर्के, ऋषिकेस गायकवाड, भाऊसाहेब खेतमाळी उपस्थितीत होते.

loading image
go to top