Ahilyanagar Rain Update : 'पावसाने जोहरापूर-देवटाकळी पर्यायी रस्ता गेला वाहून'; ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन, प्रशासनाकडून आश्वासन
Joharapur-Dewtakli Road Collapses in Rain : देवटाकळी रस्त्यावरील रेडी नदीवरील पूल एप्रिल महिन्यात २०२४ मध्ये नवीन पूल बांधण्यासाठी जुना पूल पाडण्यात आला. तेथे नवीन फुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, पुलापासून काही अंतरावर रेडी नदी पात्रात भर टाकून तात्पुरता पर्यायी रस्ता करण्यात आला होता.
Villagers Protest After Rains Destroy Alternative Route in Joharapur-Dewtakliesakal
शहरटाकळी: शेवगाव तालुक्यातील नदीवरील जोहरापूर-देवटाकळी पर्यायी रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी आज (ता.१९) सकाळी ९ वाजता नदीत उतरून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले.