Water Woes Continue: Kolhar Project Remains a Dream Due to Land Objection
Sakal
अहिल्यानगर
Kolhar Water Project: 'कोल्हारची पाणी योजना स्वप्नातच'; जागेच्या बक्षीसपत्रास चिंचोलीचा आक्षेप, दीड वर्षापासून काम ठप्प !
land award issue: कोल्हारची बहुप्रतिक्षित पाणी योजना अद्यापही स्वप्नातच अडकून पडली आहे. दीड वर्षांपूर्वी जलप्रकल्पाचे काम सुरू झाले असले तरी, चिंचोली ग्रामस्थांनी जागेच्या बक्षीसपत्रावर आक्षेप घेतल्याने संपूर्ण प्रकल्प ठप्प झाला आहे.
-सुहास वैद्य
कोल्हार: जलजीवन मिशनअंतर्गत कोल्हार खुर्द व चिंचोली (ता. राहुरी) या दोन्ही गावांची पावणे पाच कोटी रुपयांची पाणी योजना स्वप्नातच राहण्याची शक्यता आहे. चिंचोलीने योजनेच्या साठवण तलावाशेजारील जागेच्या बक्षीस पत्रास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे योजनेचे काम दीड वर्षापासून ठप्प आहे.

