esakal | अहमदनगरमध्ये लशींचा ठणठणाट! सलग सहा दिवसांपासून लसीकरण ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

no vaccine in nagar

अहमदनगरमध्ये लशींचा ठणठणाट! राज्यालाच होतोय तोकडा पुरवठा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : राज्य सरकारला कोरोना प्रतिबंधक लसींची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे नगर महापालिकेच्या लसीकरण केंद्रांत मागील सहा दिवसांपासून लसींचा ठणठणाट आहे. याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेने शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आठ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. शिवाय लसींचा जास्त साठा प्राप्त झाल्यास लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याचा कृतिआराखडाही महापालिकेने तयार केला आहे. काही दिवस शहरात त्याप्रमाणे लसीकरण उपकेंद्रेही वाढविण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात लसींचा साठाच कमी मिळत असल्याने उपकेंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. लस मिळेल, या आशेने पहिला डोस घेतलेले नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी पहाटेपासूनच आरोग्य केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. मात्र, लसच उपलब्ध होत नसल्याने त्यांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. (Lack-of-vaccines-in-Ahmednagar-marathi-news-jpd93)

लसीकरण प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

पहिला डोस घेऊन तीन महिने होत आले तरी दुसरी लस मिळत नसल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. शहरात शनिवारपासून (ता. १७) लसीकरण ठप्प आहे. दर आठवड्याला तीन ते चार दिवस लसीअभावी लसीकरण बंदच असते. महापालिकेला लस मिळाली की नगरसेवक व राजकीय कार्यकर्ते आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणतात. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेत गोंधळ निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगरच्या तहसीलदारांनी लसीकरण प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

लसीची टंचाई राज्यभर आहे. लसींचा पुरवठा झाल्यास जिल्हा परिषद तत्काळ लसी महापालिकेला देते. मात्र, पुरवठाच होत नसल्याने लसीकरण सध्या बंद आहे. लसींचा पुरवठा झाल्यावर पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येईल. - डॉ. सतीश राजूरकर, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नगर महापालिका

नगर शहरातील कोरोना लसीकरण

लोकसंख्या - सुमारे चार लाख २० हजार

पहिला डोस घेतलेल्यांची संख्या- एक लाख ३० हजार

दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या - ३८ हजार

पहिला डोस मिळालेल्यांची संख्या - ९२ हजार

हेही वाचा: भंडारदरा पाणलोटात धुवाधार पाऊस; कोथळे धरण ‘ओव्हर-फ्लो’

हेही वाचा: दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पोलिसांवर हल्ला

loading image