जामखेड शहरातील तरुण स्वच्छतेचा कामासाठी सरसावले स्वयंप्रेरणेने

For the last 15 days, the youth of Jamkhed have been volunteering for cleaning work.jpg
For the last 15 days, the youth of Jamkhed have been volunteering for cleaning work.jpg

जामखेड (अहमदनगर) : गेल्या १५ दिवसापासून जामखेड शहरातील तरुण स्वच्छतेचा कामासाठी स्वयंप्रेरणेने सरसावले असून दररोज सकाळी श्रमदानासाठी पुढे येत आहेत. यामध्ये व्यापारी, कर्मचारी, युवक संघटना, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे दहा-बारा वर्षाच्या चिमुरड्यांनीही सहभागी होऊन स्वच्छतेचा जागार सुरू ठेवला आहे. या सर्वांना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची साथ मिळते आहे, हे मात्र निश्चित...!

शहरातील प्रमुख रस्ते, आरोळेवस्ती, पोकळे वस्ती, नगर रोड हा परिसर स्वच्छ केला आहे. या भागात पसरलेल्या दुर्गंधीचे साम्राज्य सर्वांनी हटवून स्वच्छ केले.

शहराच्या स्वच्छतेकरिता गेली १५ दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, दिपक घोडके, अशोक हिंगणे, माऊली खांडवे, गणेश खांडवे, ऋषी आजबे, अनिल आजबे, अशोक पोटफोडे, अंबादास चव्हाण, दादा ढवळे, गणेश साळुंके, पप्पू साळुंके, चंद्रकांत आजबे, धनंजय कसाब, अमोल डाडर, रणजित मुंडे, विष्णू काळदाते, गणेश कोल्हे, महादेव कोल्हे, पप्पू कोल्हे यांचा समावेश राहिला.

दहा वर्षे वयोगटातील सुजन डाडर, आयन शेख, साजेब शेख, आदित्य बोराडे, साहिल आत्तार या चिमुरड्यांनीही श्रमदानाचे योगदान दिले. नऊ दिवसापासून भल्या पहाटे ही लहान मुलं उठतात आणि श्रमदानासाठी ज्याठिकाणी नागरिक एकवटलेले आहे. त्याठिकाणी जावून योगदान देतात. त्यांच्या या उपक्रमातील सहभागाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे, हे मात्र निश्चित ...!

श्रमदानासाठी रविवारचा दिवस निवडला. शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी नागणाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदराज सातपुते, संतोष राऊत, पांडूरंग मोहळकर, शिरीष बरटक्के यांच्यासह शिक्षक बांधवांनी श्रमदान केले. तसेच पुढील काळात आठवड्यातील एक दिवस श्रमदान करण्याचे ठरले. याकरिता रविवार निवडला. विठ्ठल वराट यांनी 'स्वच्छ माझं घर, स्वच्छ माझं आंगण' या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रेरणा घेतली आणि स्वतःला स्वच्छतेचा कामासाठी वाहून घेतले. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू त्यांनी तयार केले आहेत. त्यांनी फाटक्या टीशर्ट पासून बनविलेले झाडू चांगलेच चर्चेत आले.

कोल्हे मळ्यातील युवकांनी ही स्वच्छतेचा या अभियानात स्वतःला झोकून दिले. जिद्द,चिकाटी आणि तळमळीने जामखेड शहर स्वच्छ, सुंदर व्हावं; येथील नागरिकांचे आरोग्य चांगल रहावं याकरिता योगदान दिले आहे. ग्रामसेवकही श्रमदानासाठी सरसावले. त्यांनी ही निवडला आठवड्यातील एक दिवस !

शुक्रवार (05) रोजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा.मधुकर राळेभात, तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी श्रमदानासाठी योगदान दिले. तसेच आठवड्यातील एक दिवस श्रमदानासाठी देण्याचे जाहीर केले. नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी योगदान देत असल्याने आता हा उपक्रम बदलाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून 'माझी वसुंधरा अभियाना' अंतर्गत जामखेड शहरात स्वच्छतेचा जागर सुरू आहे. शहरातील नागरिकांच्या प्रबोधनासाठी त्यांनी विविध कार्यक्रम घेतले आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com