

“Parner villagers protest after an elderly woman dies in a leopard attack; tension grips the area.”
Sakal
पारनेर, टाकळी ढोकेश्वर : तालुक्यातील किन्ही येथे शेतात काम करणाऱ्या वृद्धेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना आज (ता. २) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय ७०, रा. किन्ही, ता. पारनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धेचे नाव आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.