
राहुरी: कणगर येथे रविवारी (ता. १७) शेळ्या चारणाऱ्या महिलेने थेट बिबट्याशी सामना करुन भीमपराक्रम केला. बिबट्याने शेळीवर झडप घातली तशी आजीने हातातील काठी अंगावर ताकदीने फेकली. अचानक पाठीवर काठीचा मार बसला, तसा बिबट्या बिचकला अन् जबड्यातील शेळी जागीच सोडून धूम ठोकली. शेळी जखमी झाली. परंतु, प्राण वाचले.