

Leopard Attack
Sakal
कोपरगाव: तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे बिबट्याने दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. त्यात दोघे जखमी झाले. भाऊसाहेब वाघडकर व पत्नी आशा वाघडकर असे जखमींचे नावे आहेत. मंगळवार (ता.१८) नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घटना घडली. बिबट्याने पुन्हा नागरिकांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.दिवसेंदिवस तालुक्यात बिबट्यांची दहशत वाढत चालली आहे. यावर कायमस्वरूपी ठोस उपाय करावा अशी मागणी जोर धरत आहे.