
श्रीरामपूर : श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून, आमदार हेमंत ओगले यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन या प्रशानाकडे त्यांचे लक्ष वेधले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.