

Terrifying Leopard Attack on 5-Year-Old; Family’s Quick Response Prevents Tragedy
Sakal
संगमनेर : शेडगाव येथील अवघ्या पाच वर्षांच्या श्रीराज फड याच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आई आणि आजीने दाखवलेले धैर्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. या धाडसाचे कौतुक करताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानववस्तीमध्ये घुसखोरी करणाऱ्या बिबट्यांच्या हालचालींना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबवित असल्याची माहिती दिली.