

Heartbreaking Incident: Child Killed in Leopard Attack in Ahmednagar District
Sakal
संगमनेर: घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत ठार केले. तालुक्यातील जवळे कडलग (ता. संगमनेर) येथे शनिवारी (ता. १३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धेश कडलग (वय ४) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.