

Leopard terror grips Kopargaon; attacks on women and children spark fear among villagers.
Sakal
कोपरगाव: तालुक्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत पसरली आहे. लागोपाठ दोन ठिकाणी बिबट्यांनी महिला आणि लहान मुलांवर हल्ले केले. कुठेही आणि कधीही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने दहशत निर्माण झाली. शेतमजूर आणि शेतकऱ्यांना कामासाठी शेतात जाण्याची भीती वाटू लागली. पिंजऱ्यांना हुलकावणी देणारे बिबटे अन् वन विभागाच्या मर्यादित प्रतिसादामुळे या जीवघेण्या संकटातून कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न सामान्य जनतेसमोर उभा राहिला.