
राहुरी : खडांबे बुद्रुक येथे सोमवारी (ता. ७) रात्री एका शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्या. रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान एका मादी बिबट्याने दोन पिल्लांसह शेतकरी दिनकर गोपीनाथ जाधव (रा. खडांबे बुद्रुक) यांच्या वस्तीवर धुमाकूळ घातला.