
संगमनेर : नाशिक रोड येथील सावकाराने मालदाड (ता. संगमनेर) येथील देशमुख कुटुंबाकडून व्याजाने दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात सव्वा कोटी रुपये उकळले असून, दोन वाहने जबरदस्तीने ताब्यात घेतली. यावरही समाधान न मानता जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना संगमनेर तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने नाशिक येथून अटक केली.