

Ahilyanagar News
sakal
संगमनेर : संगमनेर तालुक्यात गुरुवारी (ता. ११) व शुक्रवारी (ता. १२) या दोन दिवसांत बिबट्यांच्या दोन परस्परविरोधी घटना उघडकीस आल्या. एका बाजूला राष्ट्रीय महामार्गावरून वाहनाची धडक बसल्याने एका दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे विहिरीत पडलेल्या बिबट मादीला स्थानिक शेतकरी व वन विभागाच्या मदतीने सुखरूप जीवदान मिळाले आहे.