

Rural Education Success: Shepherds’ Children Embrace German Language and Modi Script
sakal
-मार्तंड बुचुडे
पारनेर: डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर, मेंढपाळ समाजाची वस्ती आणि मर्यादित सुविधा... अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्रे खुर्दने ग्रामीण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. एकेकाळी अवघ्या १५ विद्यार्थ्यांवर सुरू असलेली ही शाळा आज ५० हून अधिक विद्यार्थ्यांची झाली असून, ज्ञानाच्या बळावर परिवर्तनाची नवी कहाणी लिहित आहे.