
पारनेर : खोट्या कागदपत्रांद्वारे विश्वास संपादन करत ऑनलाईन पद्धतीने पेट्रोलपंप डिलरशिप मिळवून देतो, असे सांगत पेट्रोल कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून तरुणाची तब्बल २३ लाख ४३ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या बाबत अमोल राजाराम तुपे (रा. लोणीमावळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.