Leopard Attack: नरभक्षक बिबट्याला मारण्याची परवानगी! 'बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू'; कोपरगावमध्ये दुसरा बळी; आंदोलनानंतर कार्यवाही..

Leopard Kills Woman in Kopargaon: घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. ‘तुम्ही पिंजरे लावू नका. बिबटे पकडले तरी ते दूर न सोडल्याने पुन्हा याच भागात येत आहेत. नरभक्षक बिबट्या मारला तरच आम्ही रस्ता मोकळा करू. आता आम्ही ऐकणार नाही.
Forest officials launching an operation to track the man-eating leopard after a woman’s death in Kopargaon.

Forest officials launching an operation to track the man-eating leopard after a woman’s death in Kopargaon.

Sakal

Updated on

कोपरगाव: येसगाव शिवारात आदमाने वस्तीजवळ शेतात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात शांताबाई अहिलाजी निकोले (वय ६०) यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास घडली. पाच दिवसापूर्वी नंदिनी चव्हाण ही मुलगी हल्ल्यात मृत्युमुखी पडली. आंदोलनानंतर पीसीसीएफने नरभक्षक बिबटल्‍याला ठार माण्याची परवानगी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com