
राहुरी: शहरात आज (मंगळवारी) सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण प्रश्नावर मुंबई येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर सव्वा तास रास्तारोको आंदोलन झाले. याप्रसंगी असा इशारा राजूभाऊ शेटे, रवींद्र मोरे, साहेबराव म्हसे, कांता तनपुरे यांनी दिला. सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.