
घोडेगाव येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथे एक हजाराहून अधिक म्हशीची विक्री होवून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती.
सोनई (अहमदनगर) : कोरोना स्थितीत घोडेगाव (ता.नेवासे) येथील जनावरांचा बाजार बंद असला तरी, विक्रीचा नवा फंडा वापरुन अनेक व्यापारी गाय व म्हशींची ऑनलाईन विक्री करत आहेत. वधूवरांप्रमाणे गाय व म्हशीचे छायाचित्र व बायोडाटा सोशलमीडियावर टाकून विक्रीची नामी शक्कल लढविली जात आहे. (Many traders are selling cows and buffaloes online)
घोडेगाव येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथे एक हजाराहून अधिक म्हशीची विक्री होवून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. गाय-म्हशी घेण्यासाठी दिल्ली, हरियाणा, गुजरात, आंध्रप्रदेश राज्यातून व्यापारी व शेतकरी येत होते. येथे जनावरांची बोली कापडाच्या आत बोटांच्या खाणाखूणा करुन झाकून केली जायची मात्र आता कोरोना संसर्गाची स्थितीमुळे तीन महिन्यापासून बाजार बंद असल्याने हजारोंची रोजीरोटी थांबली आहे.
घोडेगावसह, चांदे, सोनई, शनिशिंगणापुर, लोहगाव, झापवाडी, शिंगवेतुकाई, वांजोळी येथील व्यापारी, दलाल व काही शेतक-यांनी व्हाॅटसअप ग्रुप तयार करुन यावर गाय व म्हशीचे छायाचित्र, व्हिडिओ व त्यांचा बायोडाटा टाकत विक्री सुरु केली आहे. रस्त्यावरील स्थिती लक्षात घेवून हा व्यवसाय सध्या जिल्ह्यातच केला जात आहे. अगोदर जनावराचे छायाचित्र पाठविले जाते. पटापटी झाली की व्हिडिओ काॅलवर जनावर चालून दाखवले जाते. फोन पे, गुगल पे किंवा आरटीजीएस द्वारे पैशाची देवाण- घेवाण होत आहे.
घरी बसल्या बसल्या मोबाईलवर म्हशींचा सौदा होत असून अतिशय पारदर्शी पद्धतीने तो निभावला जात आहे. बाजारात थंगारी व दलालाच्या घुसखोरीने शेतक-यांना मोठे नुकसान होत होते. या नव्या संकल्पनेत दोन व्यापा-यात व्यवहार होत असल्याने मधल्या सर्व अडचणींचा पत्ता कट झाला आहे.
- संतोष सोनवणे, व्यापारी घोडेगाव
बाजार बंद असल्याने शेतक-यांना मोठा फटका बसत आहे. सोशलमीडियाच्या माध्यमातून सध्या म्हैस विक्री होत आहे. सध्या सर्वत्र कोरोना स्थिती गंभीर असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत व्यवहार कमी होत आहेत.
- अनिल शेटे, शनिशिंगणापूर
(Many traders are selling cows and buffaloes online)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.