विवाहित प्रेमिकेची प्रियकरासोबत गळफास लावून आत्महत्या, पोलिसांना हत्येचा संशय

शांताराम काळे
Monday, 9 November 2020

आंबडपासून दोन-तीन किलोमीटरवरील सुतारदरा जंगलात काही मुले सीताफळे काढण्यासाठी गेली होती. डोंगरमाथ्यावर त्यांना झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण-तरुणी आढळून आले.

अकोले : तालुक्‍यातील आंबड शिवारातील सुतारदरा येथे घनदाट जंगलात काल (रविवारी) झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रेमीयुगलाचा मृतदेह आढळून आला होता.

दरम्यान, त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, ही आत्महत्या आहे की खून, याबाबत गुढ निर्माण झाले आहे. अमोल भोरू कातोरे (वय 25, रा. आंबड) व इंदिराबाई गीताराम पारधी (वय 30, रा. कुमशेत) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा - आमदार आशुतोष काळेंना भुजबळांचे बळ 

आंबडपासून दोन-तीन किलोमीटरवरील सुतारदरा जंगलात काही मुले सीताफळे काढण्यासाठी गेली होती. डोंगरमाथ्यावर त्यांना झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण-तरुणी आढळून आले. मृतदेह कुजण्यास सुरवात झाल्याने उग्र वास येत होता.

मुलांनी पोलिस पाटलांना माहिती दिली. याबाबत माहिती मिळाल्यावर अकोले पोलिस घटनास्थळी हजर झाले. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, या घटनेबाबत उलटसूलट चर्चा सुरू होती. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married girlfriend commits suicide by hanging herself with boyfriend