

Ahilyanagar to Gujarat Wildlife Transfer: Permission Sought for Shifting 500 Leopards”
Sakal
अहिल्यानगर : जिल्ह्यात वाढत्या मानव- बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व वन विभागामार्फत अल्पकालीन तसेच दीर्घकालीन स्तरांवर सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा पालकमंत्री दररोज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्याकडून आढावा घेत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या ५०० बिबट्यांना वनतारा (गुजरात) प्रकल्पासह इतर निवारा केंद्रांमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबत परवानगी मागितली आहे.