
या भागात काही वर्षांपासून बिबट्यांची संख्या वाढल्याने, त्यांच्या दहशतीखाली शेतकऱ्यांना शेताला पाणी द्यावे लागते. भर दिवसाही बिबट्यांचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. अशा स्थितीत रात्री पाणी भरण्यासाठी जीव मुठीत धरूनच जावे लागते.
संगमनेर (अहमदनगर) : तालुक्याच्या पूर्व भागातील पिंप्री- लौकी- अजमपूरमधील कृषी पंपांचा रात्री होणारा वीजपुरवठा बंद करून तो दिवसा सुरू करण्याच्या मागणीसाठी नेते भारत गिते यांनी ऊर्जामंत्र्यांना निवेदन पाठविले.
हे ही वाचा : पुणतांबे ग्रामपंचायतीचा साठवण तलाव कोरडा; पर्यायी योजनेतून तहान भागवण्याची तयारी
त्यात म्हटले आहे, आठ ते नऊ वर्षांपासून या गावांतील कृषी पंपांसाठी तीन आठवड्यांतील सलग दोन आठवडे रात्री वीजपुरवठा होतो. या भागात काही वर्षांपासून बिबट्यांची संख्या वाढल्याने, त्यांच्या दहशतीखाली शेतकऱ्यांना शेताला पाणी द्यावे लागते. भर दिवसाही बिबट्यांचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. अशा स्थितीत रात्री पाणी भरण्यासाठी जीव मुठीत धरूनच जावे लागते.
हे ही वाचा : वसुलीपेक्षा खर्च अधिक; दिवाळीचे भाडे अजून नगरपालिकेच्या फंड खात्यात नाही
याशिवाय कृषी पंपांचा खळी उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने रोहित्रे व वीजपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन वर्षे दुष्काळाचा सामना केल्यानंतर या वर्षी हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. या प्रश्नाबाबत राज्याचे ऊर्जामंत्री व शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिष्टमंडळासह भेटणार आहोत.
संपादन - सुस्मिता वडतिले