esakal | पाणी योजनांना वॉटर मीटर बसविणार - राज्यमंत्री तनपुरे
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakt Tanpure

पाणी योजनांना वॉटर मीटर बसविणार - राज्यमंत्री तनपुरे

sakal_logo
By
पुरुषोत्तम कुलकर्णी

राहुरी (जि. नाशिक) : राहुरी विधानसभा मतदारसंघातील मिरी-तिसगाव, बुऱ्हाणनगर, बारागाव नांदूरसह चौदा गावे, कुरणवाडी व इतर गावे पाणीपुरवठा योजनांना मीटर (Water meter) बसविण्यात येतील. केंदळ खुर्द-मानोरी रस्त्यावरील बंधाऱ्याच्या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे. (Water-meters-install-in-water-schemes-State-Minister-Prajakt-Tanpure-Ahmednagar-marathi-news)

ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न लवकरच निकाली

मुळा धरण येथील विश्रामगृहावर मंत्री तनपुरे यांनी जलजीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
मंत्री तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत शासनाच्या विविध निधीतून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. केंदळ खुर्द-मानोरी रस्त्यावरील बंधाऱ्याच्या पुलाच्या कामाचा प्रस्ताव जलसंपदा विभाग, नाशिक येथे अंतिम मंजुरीसाठी आहे. पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न लवकरच सुटून ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघेल. पाणीयोजनांचे थकीत वीजबिल भरून योजना सुरळीत कराव्यात, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा: 'सहकार क्षेत्र बुडविणाऱ्यांना नव्या खात्यासंदर्भात भीती'

मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, गटविकास अधिकारी गोविंद खामकर (राहुरी), शीतल खिंडे (पाथर्डी), ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी प्रवीण जोशी (नगर), अनिल सानप (पाथर्डी), जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, पोपट भणगे, पाणीयोजनांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, भास्कर गाढे, पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, बाळासाहेब लटके, सुरेश निमसे, अविनाश ओहोळ, बाबासाहेब भिटे, काशिनाथ लवांडे, गोविंद मोकाटे, अमोल भनगडे, सुयोग नालकर, सुनील मोरे, बाळासाहेब खुळे, सचिन भिंगारदे, संतोष आघाव, धीरज पानसंबळ आदी उपस्थित होते.

(water-meters-install-in-water-schemes-State-Minister-Prajakt-Tanpure-Ahmednagar-marathi-news)

हेही वाचा: 'नेता राहुल गांधी जैसा हो! ही घोषणा बैलांनाही आवडली नाहीये' - फडणवीस

loading image