
MLA Amol Khatal appeals for unity in local self-government bodies for people’s development.
संगमनेर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. विधानसभेत जसा एकजुटीने विजय मिळविला तसा विजय जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही मिळवायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.