esakal | "श्रीरामपुरात तलाठी कार्यालयाच्या 36 इमारती नव्याने उभारणार"
sakal

बोलून बातमी शोधा

"श्रीरामपुरात तलाठी कार्यालयाच्या 36 इमारती नव्याने उभारणार"

"श्रीरामपुरात तलाठी कार्यालयाच्या 36 इमारती नव्याने उभारणार"

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : ‘‘कोरोनामुळे (Corona) राज्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे केली जाणार असून, श्रीरामपूर तालुक्यात लवकरच तलाठी कार्यालयाच्या ३६ इमारती नव्याने उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे,’’ अशी माहिती आमदार लहू कानडे (MLA lahu kanade) यांनी दिली.

हेही वाचा: श्रीरामपूर तालुक्यात बाधितांचा आकडा हजारापार

तालुक्यातील भोकर-घुमनदेव रस्ता, भोकर- अडबंगनाथ रस्ता, तसेच दिघी रस्ता, खैरी निमगाव ते जाफराबाद रस्ता यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. या वेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्येष्ठ नेते इंद्रभान थोरात, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समिती सदस्य डॉ. वंदना मुरकुटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: श्रीरामपूर येथे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू

तालुक्यातील ग्रामीण भागात दळणवळणाला प्राधान्य देत, १९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने, आणखी वाढीव बेडची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, बालकांसाठी आता २५ बेड उपलब्ध केले जाणार आहेत. ऑक्सिजनसाठी ग्रामीण रुग्णालयात दोन कोटी रुपये निधीतून प्लँटची उभारणी सुरू आहे. त्यामुळे रुग्णांसाठी बाहेरून ऑक्सिजन आणण्याची गरज पडणार नाही. ही सर्व विकासकामे मतदारांच्या आशीर्वादाने होत आहेत. मतदारसंघात अजून अनेक विकासकामे करायची आहेत. अनेक योजना राबवून त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवायच्या आहेत. त्यातून मतदारसंघाचा विकास साधायचा असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले. यानिमित्ताने कृषिमित्र सोपान पटारे यांचा सत्कार करण्यात आला, तर सुदाम पटारे यांनी सूत्रसंचालन केले.

loading image