भाजपने शब्द पाळला; चांगली विकास कामे केल्याने नागरीक सोबत राहतील, मोनिका राजळेंचा विश्वास

MLA Monica Rajale has expressed confidence that by doing good development work citizens will be united again with Bharatiya Janata Party
MLA Monica Rajale has expressed confidence that by doing good development work citizens will be united again with Bharatiya Janata Party

पाथर्डी (अहमदनगर) : शहर व उपनगरातील नागरीकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा पालिका निवडणुकीत दिलेला शब्द भारतीय जनता पक्षाने पाळला आहे. महिलांसाठी ग्रीनजिम व पालिकेच्या खुल्या जागेचे सुशोभीकरणाचे काम आहे. विजयनगर, वामनभाऊ नगर, आसरा नगर, खंडोबानगर, सावता नगर या ठिकाणी हे काम करण्यासाठी एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. चांगली विकास कामे केल्याने नागरीक संघटीतपणे पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत राहतील, असा विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला.

नगरपरिषदेच्या वैशिष्टपूर्ण योजनेच्या निधीतून शहरातील पालिकेच्या खुल्या जागेचे सुशोभीकरण व महिलांसाठी व्यायाम शाळाच्या विविध कामासाठी एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. विकास कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमात राजळे बोलत होत्या. नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पंचायत समितीच्या सभापती सुनिता दौंड, उपसभापती मनिषा वायकर, अशोक चोरमले, मंगल कोकाटे, मनिषा घुले, बजरंग घोडके, महेश बोरुडे, नामदेव लबडे, काकासाहेब शिंदे, रामदास बर्डे, रामेश्वर कर्डीले, रावसाहेब मोरे, अशोक मंत्री, अजय भंडारी, रमेश गोरे, अनिल बोरुडे, रामनाथ बंग, बबन बुचकुल, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, शहरातील रस्ते, गटारी, पुल, विजवितरण व्यवस्था, पथदिवे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जाँगिंग पार्क, बंदीस्त नाट्यगृह, रामगिरीबाबा टेकडी सुशोभीकरण पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन आदी कामे प्रामुख्याने मार्गी लावण्यात आली आहेत. शहराची जायकवाडीची पाणी योजना तांत्रिक मंजुरी मिळाली. मात्र सरकार बदलले आहे. तरीही विकासाच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही. पालिकेचे पदाधिकारी चांगले काम करीत आहेत. यावेळी डॉ.मृत्युंजय गर्जे यांनी प्रास्ताविक केले तर महेश बोरुडे यांनी आभार मानले. 

दोन वर्षापूर्वी सकाळच्या तनिष्का गटाच्या मनिषा घुले व सदस्यांनी आमदार मोनिका राजळे व पालिकेचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांना लेखी निवेदन देऊन  विजयनगरमध्ये महिलांसाठी ग्रीनजिम सुरु करण्याची मागणी केली होती. राजळे यांनी तनिष्का सदस्यांची मागणी पूर्ण केल्याने मनिषा घुले यांनी राजळे व पालिकेच आभार मानले.

संपादन - सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com