Leopard Attack: 'मोहरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू'; परिसरात भीतीचे वातावरण
Rising Wildlife Threat: मोहरी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून यात एका वासराचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला चढवल्यामुळे जनावराला सावरताही आले नाही. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
खर्डा: मोहरी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुखदेव श्रीरामे यांच्या बैलाचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात रावसाहेब चव्हाण यांच्या वासरावर हल्ला केला होता. यात त्या वासराचा मृत्यू झाला होता.