

Shocking Moneylending Case Two Crore Debt Swells to 22 Crore as Two Accused Arrested by Police in Maharashtra
sakal
अहिल्यानगर: जमीन तारण ठेवून घेतलेल्या दोन कोटी रुपयांच्या कर्जापोटी मुद्दल व व्याजासह तब्बल तीन कोटी ७५ लाख रुपये परत करूनही तारण ठेवलेली जमीन परत न देता आणखी १८ कोटी ३८ लाख १४ हजार ६९५ रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.